Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorized*अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव...

*अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे*

*अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे*

*कोंढाळा-सिंड्राई घाटातील ट्रॅक्टर अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

गडचिरोली, दि. २७ : देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई घाट, वैणगंगा नदी परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

मौजा कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई घाट परिसरात श्री. विलास महादेव ढकले (वय अंदाजे ३६, रा. जिल्हेवाडा, ता. देसाईगंज) हे ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाची नियुक्ती करून घटनास्थळाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

जिल्हा भरारी पथकाने केलेल्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, १० जून २०२६ नंतर संबंधित रेतीघाटावरील उत्खनन बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही त्या ठिकाणी अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. तसेच या अवैध प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

या निष्कर्षांच्या आधारे संबंधित क्षेत्रातील महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना टिस्कुले आणि तलाठी श्री. महादास ठाकरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

याशिवाय, या प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन तहसीलदार, देसाईगंज श्रीमती प्रिती डुढलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीस कोणतीही पाठीशी घालण्याची भूमिका स्वीकारली जाणार नाही. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डॉ.आकाश आर. हेमके ‌
मुख्य संपादक

मो.न.9511774207 I 7219337794

72193377949511774207
शैलेश शंकरराव पोटुवार ‌
मुख्य उपसंपादक

मो.न. 9422838665 I 9767616465

95117742077219337794
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular