Wednesday, June 10, 2026
Google search engine
HomeUncategorized*वडसा रेल्वे स्थानकाजवळील मार्ग १० जून ते २ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

*वडसा रेल्वे स्थानकाजवळील मार्ग १० जून ते २ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

*वडसा रेल्वे स्थानकाजवळील मार्ग १० जून ते २ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बं

 

गडचिरोली, दि. १० : वडसा रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक दिनांक १० जून २०२६ ते २ जुलै २०२६ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

वडसा रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ मार्गावर मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अपघाताची शक्यता तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, यासाठी सदर अंडरपासच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, महावितरण दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८, भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील प्रचलित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

डॉ.आकाश आर. हेमके ‌
मुख्य संपादक

मो.न.9511774207 I 7219337794

72193377949511774207
शैलेश शंकरराव पोटुवार ‌
मुख्य उपसंपादक

मो.न. 9422838665 I 9767616465

95117742077219337794
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular