Wednesday, June 10, 2026
Google search engine
Homeवडसा*जुनी वडसा येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा**

*जुनी वडसा येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा**

**जुनी वडसा येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा*

*दिनांक:- २७ मार्च २०२६*

देसाईगंज/ जुनी वडसा:—- मौजा जुनी वडसा येथे २२ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यातील २५ मार्च रोजी ‘एक रात श्रीराम के नाम माँ भगवती जागरण ग्रुप सावलगाव’ यांचा जागरणाचा कार्यक्रम भव्यतेने पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून स्वीकृत नगरसेवक मा. राजूभाऊ जेठाणी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सांगता केली. विशेष अतिथी म्हणून दामोदरजी शिंगाडे, ताजुल उके, मिलिंद उईके, गजानन राऊत, नगरसेवक लताताई मुळे, ममता ताई गोंगले, युवराजजी गोंगले व इतर पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

श्रीराम मंदिरासमोर सजवलेल्या मंडपात श्रीराम, सीता व भगवतींची भव्य चित्रे, भगवा पताका व दिव्यांच्या सजावटीने वातावरण न्हाऊन निघाले. जागरण ग्रुप सावलगावच्या भजन-कीर्तनाने रात्रभर भक्तीचा सोहळा साजरा झाला. ग्रामस्थ, महिलां व युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी अध्यक्षीय भाषणात श्रीराम भक्ती व सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. सनातन संस्कृती जपण्यासाठी असे धार्मिक उपक्रम वाढवावेत, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक राजूभाऊ जेठाणी व इतर अतिथींनीही श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत ग्रामविकासाच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ.आकाश आर. हेमके ‌
मुख्य संपादक

मो.न.9511774207 I 7219337794

72193377949511774207
शैलेश शंकरराव पोटुवार ‌
मुख्य उपसंपादक

मो.न. 9422838665 I 9767616465

95117742077219337794
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular